कोरोना लॉकडाऊन संधी कि सुसंधी!!!
कोरोना लॉकडाऊन संधी कि सुसंधी!!!
बिझिनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट
मित्रांनो मागच्या 21 तारखेपासून आपण आपला व्यवसाय आणि आपली दैनंदिनी बदलून कोविंड नाईन्टीन किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे एकतर आपण घरून व्यवसाय चालवतोय किंवा सध्या आपला व्यवसाय बंद आहे. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी पुढे व्यवसायाचं काय होणार आता काय करायचं याच्याबद्दल चिंता सुरू असते परंतु आपण चिंता करण्याऐवजी चिंतन केलं तर त्याचा आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आपण वापर करू शकतो.
“21 दिवस चिंतेचे नव्हे तर चिंतनाचे”
आपण व्यवसाय करीत असताना ज्या ज्या व्यक्तींसोबत व्यवसाय करतांना आपला संपर्क आला, ते सर्व, आपले ग्राहक, आपले मित्र आणि आपल्या व्यवसायासंबंधी येणाऱ्या इन्क्वायरी, या सर्वांसोबत आपल्याला पुढचे 21 दिवस वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधला पाहिजे. या सर्वांशी आपण एसएमएस, व्हाट्सएप मेसेज किंवा प्रसंगी प्रत्यक्षात बोलून संवाद साधावा. त्यांना हे सांगावे लागेल की हे लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर किंवा कोरोना व्हायरसची व्याधी गेल्यानंतरसुद्धा आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आमच्या सर्विसेस आणि आमचे प्रोडक्ट तुमच्या पर्यंत पोहोचणार आहेत. तुम्ही याचा अश्या पद्धतीने विचार करा, समजा आपल्या परिवारामध्ये कुणाचं लग्न असतं तर आपण घेतली असती ना चार दिवसाची सुट्टी? किंवा आपण आपल्या व्यवसायाची पर्यायी व्यवस्था केली असती ना? तसंच हे 21 दिवस आपला व्यवसाय, आपलं दुकान अशाच काही कारणासाठी बंद होतं असं समजून आपण एक पॉझिटिव्ह विचार करायला हरकत नाही. पण त्यामुळे आपला व्यवसाय बंद झाला आहे का तर माझं म्हणणं आहे मुळीच नाही.
आता तुम्ही विचार करा २१ दिवस फक्त आपलाच व्यवसाय बंद होता का? आपल्यासोबत बऱ्याच लोकांचा व्यवसायसुद्धा या २१ दिवसात बंद होता. मग या दिवसांमध्ये आपण काही नवीन स्किल सेट शिकू शकतो का? असं स्किल सेट जे पुढे जाऊन माझ्या व्यवसायात किंवा माझ्या जीवनात एक नवीन वर्टीकल उभं करू शकतं, माझ्यासाठी अर्थार्जन करण्याची एक नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकते. असं स्किल सेट की जी माझ्या आत्ताच्या व्यवसायाला पूरक ठरू शकते किंवा त्याला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाऊ शकते .
माझ्या आजूबाजूला काही असे व्यवसाय किंवा व्यावसायिक आहेत का? त्यांच्यासोबत मी जॉइंटली काम करू शकतो? एकट्याने व्यवसाय करणे ही संकल्पना जुनी होत चालली आहे. त्यामुळे माझ्या आजूबाजूला कुठेही ही माझ्या व्यवसायच्या पूरक दुसरे कोणी काम करत असेल तर आपण त्यांच्यासोबत मिळून स्वतःचा आणि त्याचा व्यवसाय आपण वृद्धिंगत करू शकतो.
थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण आपली सिनर्जी तयार केली पाहिजे उदाहरणार्थ
एक व्यक्ती समजा 70 किलो वजन उचलू शकत असेल, तर दोन व्यक्ती किती वजन उचलू शकतात? निश्चितच 140 किलोपेक्षा जास्त वजन ते दोघे व्यक्ती मिळून उचलू शकतात. याचा अर्थ दोन वेगवेगळ्या व्यवसायातले व्यक्ती मिळून काम करत असतील तर त्यांच्या कामाचा आवाका आर्थिकदृष्ट्या वाढत जातो. एखादा ऑटोमोबाईल पार्ट विकणाऱ्या व्यक्तिने जर टायर विकणाऱ्या व्यावसायिका सोबत टाय-अप केले तर दोन्ही व्यवसाय वाढण्याचे चान्सेस जास्ती असतात. या गोष्टी दोघांनाही पूरक आणि फायदेशीर ठरू शकतात. एखादा कम्प्युटर विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने दुसऱ्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट सोबत टाय-अप केले. तर इन्स्टिट्यूट मध्ये शिकणारे विद्यार्थी कम्प्युटर घेताना कंप्यूटर व्यावसायिकाकडे येऊ शकतात. तसेच कंप्यूटर किंवा लॅपटॉप घेणारे ग्राहक हे कंप्युटर कोर्सेसकरीता इन्स्टिट्यूटला येऊ शकतात. अशा परिस्थितीत दोन्ही व्यवसायाचे ग्राहक एकमेकांकडे गेल्यामुळे दोन्ही व्यवसायांची प्रगती होऊ शकते.
पुढील काळात फक्त एकाच व्यवसायात मध्ये गुंतून राहण्यापेक्षा आपण येणाऱ्या काळात कुठले व्यवसाय हे काळानुरूप असणार आहे? याबद्दलची माहिती मिळवायला हरकत नाही. ग्राहकांना येणाऱ्या काळात कुठल्या सर्विसेस किंव्हा कुठले प्रॉडक्ट, कुठल्या वस्तू अपेक्षित आहे? या गोष्टींवर विचार करून त्याला लागणारे विविध पैलू आणि स्किल यावर आपण विचार करायला पाहिजे.
माझ्या बिजनेस कंटिन्युटी प्लॅनला ४ एस्पेक्ट असले पाहिजे.
- पहिला म्हणजे सोल्युशन. येणाऱ्या काळातील आव्हानांसाठी माझ्याकडे कुठले सोल्युशन आहेत?
- दुसरा म्हणजे इम्प्लिमेंटेशन. जे सोल्युशन मी आव्हानांसाठी काढलेले आहेत ते मी कसे? आणि किती वेळात? आपल्या व्यवसायावर इम्प्लिमेंट करणार आहे? म्हणजे आपल्याला इम्प्लिमेंटेशनचा टाईम टेबल तयार करायचा आहे व त्यावर अंबलबजावणी करायची आहे.
३. तिसरा म्हणजे टेस्टिंग. आपण जे सोल्युशन आपल्या आव्हानांसाठी काढले आहे ते आपल्या व्यवसायाकरिता कशा पद्धतीने टेस्ट करणार आहोत?
४. चौथा म्हणजे या बिजनेस कंटिन्युटी प्लॅनला नेक्स्ट लेवलवर म्हणजे पुढच्या पायरीवर कसं घेऊन जाणार?
या बिजनेस कंटिन्युटी प्लॅनच्या ४ पायऱ्यांची अंमलबजावणी व्यवस्थित पार पाडली पाहिजे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे मला माझा व्यवसाय वाचवायचा आहे किंवा रिकव्हर करायचा आहे हा विचारच करायचा नाही, तर माझा व्यवसायाचा स्पॅन मला कसा वाढवता येईल? तसेच माझा व्यवसाय मी दुसऱ्या व्यवसायासोबत कसा इंटिग्रेट करू शकतो? यावर आपल्याला फोकसं करणे गरजेचे आहे. आपल्याला येणाऱ्या काळात “चेंज मॅनेजमेंट” शिकावं लागेल. “चेंज मॅनेजमेंट” आपल्या व्यवसायात इम्प्लिमेंट केल्यामुळे आपण इंडिव्हिज्युअल म्हणजेच वैयक्तिक व्यवसायिक राहण्याचे धोके बऱ्याच अंशी कमी होतील.
याकरिता आपण पी.डी.सी.ए. मॅनेजमेंट पद्धतीचा उपयोग करू शकतो. पी.डी.सी.ए. म्हणजे प्लॅन डू चेक ॲक्ट. पीडीसीए ची मॅनेजमेंट पद्धत वापरून आपण आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची गुणवत्ता वाढवू शकतो. आज मी कुठल्याही व्यवसायात असलो तरी कोरोनाचा माझ्या व्यवसायाला कुठे ना कुठे फटका बसलेला आहे. या फॅक्टरचा आत्ता मी “इम्पॅक्ट एनालिसिस” केलेलं आहे काय? आज मी कुठल्या व्यवसायात आहे? माझा वार्षिक टर्नओव्हर किती आहे? तो यावर्षी किती असणार आहे? माझ्या मार्केटिंगला आता कशा पद्धतीने मला बदलाव लागेल? असे आपल्या व्यवसायासंबंधी अनेक पॉइंटर आपण लिहायला पाहिजे. याबरोबर माझा व्यवसाय आत्ता मी कुठे करतो आणि मी तो कुठे कुठे करू शकतो? यावरआपण विचार केला पाहिजे. आपल्या व्यवसायाला आपण दुसऱ्या व्यवसायासोबत इंटिग्रेट करणे गरजेचे आहे, याचं एक्सेप्टन्स आपल्याला गरजेचे आहे. यामध्ये तीन स्टेज येतात
१. ग्रोथ मॅनेजमेंट
२. वर्टीकल एक्स्प्लोरेशन
३. सोशल मीडियाचा वापर
येणाऱ्या काळात निसर्गाने लादलेल्या सक्तीच्या विश्रांतीचे आपण संधीत कसे रूपांतर करू शकतो हेच आपल्या व्यावसायिक यशाचे गमक असणार आहे.
अभिषेक आचार्य, (संचालक), डिझविझ प्रोडक्शन, नागपूर, 9326976946, abhishek.dizviz@gmail.com