डी.डब्लू.ग्रिफिथ
चित्रपट कलेचा जन्म झाला आणि नजीकच्या कालखंडातच तिने अनेक कलावंतांचे ध्यान आकर्षून घेतले. यापैकी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डी.डब्लू.ग्रिफिथ
चित्रपट कलेचा जन्म झाला आणि नजीकच्या कालखंडातच तिने अनेक कलावंतांचे ध्यान आकर्षून घेतले. यापैकी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डी. डब्लू. ग्रिफिथ. या माणसाने चित्रपटाची परिभाषाच बदलून टाकली. चित्रपटाला त्याने सर्वार्थाने लांबी, रुंदी, उंची आणि खोली दिली. मात्र त्याचे नशीब असे की, त्याच्याबद्दल जेवढे वाद झाले तेवढे इतर कुठल्याही दिग्दर्शकासंदर्भात झाले नाहीत. आजदेखील, एकीकडे जगभरच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ग्रिफिथचे चित्रपट अभ्यासले जातात त्याचा “Father of film Grammar” असा उल्लेख केला जातो, तर दुसरीकडे त्याच्या ‘ख्याती’बद्दल आक्षेपही घेतले जातात. नुकताच नेटवर एका समीक्षकाने लिहिलेला लेख वाचण्यात आला. त्याने लेखाची सुरुवातच अशी केली आहे. “Is there anybody today who will dare to praise Griffith?” या लेखात तो पुढे लिहितो की, ‘ग्रिफिथने नवे शोध लावलेले नाहीत. इतरांचे शोधच साफसुफ करून वापरले’. ग्रिफिथचा जन्म १८७५ साली झाला. त्याचे वडील सैन्यात बऱ्या नोकरीवर होते, पण दारू पिणे आणि जुगार खेळणे अशा व्यसनात त्या माणसाने स्वतःच्या नाश करून घेतला. ग्रिफिथ १० वर्षांचा असतानाच ते मरण पावले. मात्र ग्रिफिथची वडिलांवर फार श्रद्धा होती. ‘मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम कुणावर केले असेल तर ते माझ्या वडिलांवर’ असे त्याने लिहून ठेवले आहे. वडील वारल्यावर घरची परिस्थिती नाजूक बनली. चरितार्थासाठी त्याने लहानसहान कामे करण्यास सुरुवात केली. त्याला साहित्याची चांगली जाण होती. कवी आणि नाटककार म्हणून लौकिक मिळवावा अशी त्याची इच्छा होती. त्याने नाटके लिहिली. पण त्यात त्याला फारसे यश आले नाही.मग त्याने गोदीमध्ये बांधकामावर नोकरी पत्करली, पण आपले लेखन मात्र चालूच ठेवले. या सुमारासच त्याला ‘चित्रपट’ या नव्या कलेबदल आकर्षण निर्माण झाले. लेखक असल्यामुळे प्रथम त्याने काही चित्रपटांच्या कथाकल्पना लिहून पाहिल्या. त्या घेऊन तो निर्मात्यांकडे खेटे घालू लागला. काही दिवसांनी त्याच्या खटपटीस यश आले. न्यूयॉर्कच्या बायोग्राफ कंपनीने त्याच्या काही कथा स्वीकारल्या. कंपनीच्या काही चित्रपटात त्याने भूमिकाही केल्या.
त्याची साहित्याची आवड, सिनेमातली रुची पाहून कंपनीने त्याला १९०८ साली ‘द ऍड्व्हेंचर ऑफ डॉली’ या सिनेमाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा त्याचा स्वभाव असल्यामुळे लवकरच त्याने चित्रपटकलेच्या सर्व अंगावर प्रभुत्व मिळविले. काही दिवसात तो ‘बायोग्राफ’ कंपनीचा सर्वात महत्त्वाचा कर्मचारी बनला.
त्या काळात चित्रपटांची लांबी फार कमी असे. त्यामुळे एक दिग्दर्शक वर्षात अनेक चित्रपट तयार करू शके. ग्रिफिथचा कामाचा धडाका एवढा जबरदस्त होता की, १९०८-१३ या कालखंडात त्याने सुमारे ४५० चित्रपट दिग्दर्शित केले. एवढी विपुल निर्मिती केल्यामुळे साहजिकच त्याचा चांगला हात बसला. त्याने चित्रपटाच्या साऱ्या घटकांचा तपशीलवार अभ्यास केला. सर्वप्रथम त्याने चित्रपटातील शॉट्सची संख्या वाढविली. त्यामुळे त्याच्या कहाण्या वेगवान बनल्या. त्या काळी कॅमेरा सहसा एका जागीच ठेवून चित्रीकरण केले जाई. ग्रिफिथने कॅमेरा नटांच्या जवळ आणून क्लोजअप्स घ्यायला सुरुवात केली. लॉग शॉट्स, मुड लाइटिंग अशा संकल्पना त्याने प्रत्यक्षात उतरविल्या तंत्राच्या प्रगतीतन कथेचे वेधकपण कसे वाढवायचे हे त्याला उमगले होते. त्याच्या मनात अनेक भन्नाट कल्पना येत व त्यांचा वापर करण्यास तो मागेपुढे पाहत नसे. त्याच्या सिनेमातले क्लोजअप पाहून अनेकजण प्रश्न विचारीत, पडद्यावर फक्त चेहरा दाखविल्यास समजेल का? त्यावर ग्रिफिथचे उत्तर ‘तुम्ही चित्रपट पाहायला शिकावे हाच तर माझा उद्देश आहे’, असे राही. मात्र या प्रयोगावरुन त्याचे मालकांशी नेहमीच वाद होत. या प्रयोगामुळे त्यांचा खर्चही वाढे. पण तो आपला हट्ट नेहमीच पुरा करून घेई. त्याचे चित्रपट लोकप्रिय होत असल्यामुळे निर्मात्यांनाही त्याचे म्हणणे ऐकावे लागे.
ग्रिफिथच्या अनेक चित्रपटात ‘कुटुंबसंस्था’ ही थीम वापरलेली आढळते. कुटुंबाची घडण, त्याचे विघटन, ताटातूट व पुनर्मिलन… कुटुंबातले सौख्य आणि ताणतणाव असे अनेक विषय घेऊन त्याने ढासाळत्या अमेरिकन कुटुंबव्यवस्थेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्या काळी बहुतेक चित्रपट स्टुडिओत सेट उभारूनच चित्रित केले जात. ग्रिफिथने प्रथम चित्रपट स्टुडिओबाहेर काढण्याचा आग्रह धरला. चित्रीकरणासाठी त्याने एक खेडे निवडले. त्या खेड्याचे नाव हॉलीवूड होते. नंतर अनेक कंपन्याही तेथे येऊ लागल्या हळहळ विस्तारत त्याला आजचे भव्य स्वरूप प्राप्त झाले. ‘बायोग्राफ’ ही अशा तहेने हॉलीवूडमध्ये चित्रपट निर्माण करणारी पहिली कंपनी ठरली.
जास्त लांबीचे चित्रपट निर्माण करण्याचा ग्रिफिथचा ध्यास वाढतच गेला. १९१३ साली त्याने ‘ज्युडिथ ऑफ बो थोलिन’ नावाचा सुमारे ४० मिनिटांचा चित्रपट, कंपनीच्या मालकापासुन चोरून निर्माण केला. हे समजल्यावर मालकांनी त्याच्या हातून दिग्दर्शनाची सूत्रे काढन घेतली. त्यामुळे त्याने आपले काही सहकारी घेऊन ती कंपनी सोडली व तो ‘म्युच्युअल’ नावाच्या कंपनीत दाखल झाला. येथे आल्यावर सुमारे वर्षभर तो एका अत्यंत महत्त्वाच्या धाडसी प्रकल्पाची मनोमन आखणी करत होता. त्याने थॉमस डिस्कन नावाच्या लेखकाची ‘द क्लॅन्समन’ नावाची कादंबरी (व तिच्यावरील नाटक) वाचली होती. या कथेत दक्षिण अमेरिकेतील दोन कुटुंबाची कहाणी सांगितलेली होती व या कहाण्यांना अमेरिकेन स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी होती. उत्तर अमेरिकेतील उदारमतवादी राज्ये व दक्षिणेतील पुराणप्रिय, परंपरावादी राज्ये यांच्यातील संघर्ष त्यात रंगविला होता. दक्षिणेतील राज्यात निग्रोना गुलाम म्हणून अत्यंत वाईट वागणूक दिली जाई. गुलामगिरी नष्ट करण्यास त्यांचा विरोध होता या कालखंडाचे चित्रण करताना भव्य दृश्ये, तुंबळ लढाया, कॅमेराचा व संकलनाचा अभिनय यापर करून, त्याला प्रभावी व्यक्तिरेखाटनाची जोड देत ग्रिफिथने १६५ मीटर लांबीचा दीर्घ चित्रपट निर्माण केला. या चित्रपटासाठी त्याने सुमारे १.१० लाख डॉलर खर्च केले तो आजवरच्या चित्रपट निर्मितीच्या खर्चांचा उच्चांक होता. या चित्रपटाचे नाव ‘द बर्थ ऑफ अ नेशन’ असे त्याने ठेवले. (मात्र लॉस एजेलिसमध्ये तो ‘द कलॅन्समन या नावाने प्रदर्शित झाला.)
‘द बर्थ ऑफ अ नेशन’ च्या चित्रीकरणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा संपूर्ण चित्रपट ग्रिफिथच्या डोक्यात तयार होता. त्याने या सिनेमासाठी पटकथाही लिहून काढली नाही. हा चित्रपट प्रचड लोकप्रिय ठरला. एका वर्षात सुमारे १० लाख लोकांनी तो पाहिला. उत्पन्नाचे पूर्वीचे सारे विक्रम त्याने मोडले. इतके की किती पैसा मिळाला याचा हिशोषही त्याना ठेयता आला नाही. लुईस मेयर नावाच्या पैसा कमायला गृहस्थाने या चित्रपटाच्या इंग्लडमधील वितरणाचे हक्क घेतले होते त्यात त्याने इतका पैसा कमावला की त्यातून त्याने स्वतःची फिल्म कंपनी काढली ती पुढे चालून सुपसिद्ध ‘मेट्रो गोल्डविन मेयर’ म्हणून नावारूपाला आली, या.चित्र पटाने प्रभावित होऊन मार्गारेट मिशेलने ‘गॉन विथ द विंड’ ही कादंबरी लिहिली असे म्हटले जाते .