ACHARYA ABHISHEK

डी.डब्लू.ग्रिफिथ

चित्रपट कलेचा जन्म झाला आणि नजीकच्या कालखंडातच तिने अनेक कलावंतांचे ध्यान आकर्षून घेतले. यापैकी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डी.डब्लू.गिफिथ.

या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे आणखी एक गोष्ट घडली. त्याने चित्रपट या कलेबद्दल जनसामान्यांच्या मनात प्रचंड कुतुहल निर्माण झाले. साऱ्या देशाचे लक्ष या नव्या कलेकडे वळले. ‘द बर्थ ऑफ नेशन’च्या प्रीमिअर नंतर ग्रिफिथने न्यूयॉर्क टाइम्सला एक मुलाखत दिली. त्यात तो म्हणतो (सिनेमामुळे) “माणूस अधिक वेगाने, अधिक जाणकारीने विचार करू लागेल. त्याला सारे काही दिसेल’. एक काळ असा येईल- येत्या १० वर्षांतच- की मुलांना सारे काही चित्रपटाद्वारेच शिकविले जाईल. त्यांना इतिहासाची पुस्तके वाचावी लागणारच नाहीत.” या कलेबद्दल त्याला केवढा आत्मविश्वास होता हे यावरून स्पष्ट होते.

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दाखविण्यात आलेला तो पहिला चित्रपट होता. प्रेक्षकांनी व समीक्षकांनी नावाजलेल्या या चित्रपटावर टीकाही तशीच पराकोटीची झाली. ‘नॅशनल असोसिएशन फॉर एडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल’ या संस्थेने हा चित्रपट वंशवादी असल्याची टीका केली. त्यात थोडेफार तथ्यही होते. या चित्रपटातील गोऱ्या स्त्रियांच्या सान्निध्यात येणाऱ्या निग्रोंच्या भूमिका गोऱ्या कलाकारांनीच मेकअप करून केल्या. सुशिक्षित अमेरिकनांच्या मनावर वंशवादाची छाया कशी होती हे अनेक प्रसंगांतुन दिसते. निग्रोविषयीची चीडही या सिनेमात अनेक ठिकाणी प्रकट झालेली दिसते. मात्र ग्रिफिथ या टीकेने व्यथित झाला. त्याला हा आरोप मान्य नव्हता. त्याने आपल्या परीने या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या टीकेला उत्तर म्हणन त्याने १९१६ साली ‘इंटॉलरन्स’ हा ‘द बर्थ’ पेक्षाही भव्य व प्रदीर्घ चित्रपट निर्माण केला. माणसांना आपल्या सहिष्णुतेमुळे दुःखे भोगावी लागतात, हे सूत्र घेऊन त्याने चार दीर्घ व वेगवेगळ्या कालखंडातील घटना एकाच चित्रपटात ल्या. हा एक अत्यंत अभिनव व धाडसी प्रयोग होता. अडीच हजार वर्षाचा कालपट मांडणारा हा चित्रपट १७०मि.मी. लांबीचा होता. इ. स. पूर्व ५३८ मध्ये झालेला बॅबिलॉनचा पाडाव, ख्रिस्ताला सुळीवर देण्याचा प्रसंग, इ.स. १५७२ मधील सेट बार्थीलोमेवचा वध व समकालीन अमेरिकेतील गुन्हेगारी अशा चार कथा त्याने यात मांडल्या.

‘इंटॉलरन्स’चे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सेट होते. एवढे प्रचंड सेट वापरलेला हा पहिला सिनेमा. ग्रिफिथने बनविलेला बॉबिलोनच्या प्रचंड भिंतीचा सेट चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर हॉलिवूडमध्ये तसाच ठेवला होता. अग्निशामक दलाने या सेटला धोकादायक ठरवून तो नष्ट करण्याचा हुकम केला, पण तो तोडण्यासाठी लागणारा पैसा ग्रिफिथजवळ नव्हता. त्यामुळे सुमारे चार वर्षे, ऊन, पाऊस, झेलत तो सेट तसाच उभा राहिला. त्याची बरीच नासधूस झाली. ‘द बर्थ ऑफ अ नेशन’ ग्रिफिथच्याया चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे आणखी एक गोष्ट घडली. त्याने चित्रपट या कलेबद्दल जनसामान्यांच्या मनात प्रचंड कुतुहल निर्माण झाले. साऱ्या देशाचे लक्ष या नव्या कलेकडे वळले. ‘द बर्थ ऑफ नेशन’च्या प्रीमिअर नंतर ग्रिफिथने न्यूयॉर्क टाइम्सला एक मुलाखत दिली. त्यात तो म्हणतो (सिनेमामुळे) “माणस अधिक वेगाने, अधिक जाणकारीने विचार करू लागेल. त्याला सारे काही दिसेल’. एक काळ असा येईल- येत्या १० वर्षांतच- की मुलांना सारे काही चित्रपटाद्वारेच शिकविले जाईल. त्यांना इतिहासाची पुस्तके वाचावी लागणारच नाहीत.” या कलेबद्दल त्याला केवढा आत्मविश्वास होता हे यावरून स्पष्ट होते.

‘इंटॉलरन्स’चे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सेट होते. एवढे प्रचंड सेट वापरलेला हा पहिला सिनेमा. ग्रिफिथने बनविलेला बॉबिलोनच्या प्रचंड भिंतीचा सेट चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर हॉलिवूडमध्ये तसाच ठेवला होता. अग्निशामक दलाने या सेटला धोकादायक ठरवून तो नष्ट करण्याचा हुकम केला, पण तो तोडण्यासाठी लागणारा पैसा ग्रिफिथजवळ नव्हता. त्यामुळे सुमारे चार वर्षे, ऊन, पाऊस, झेलत तो सेट तसाच उभा राहिला. त्याची बरीच नासधूस झाली.शेवटी १९१९ साली तो पाडण्यात आला. कारण त्यावेळी पाडण्याचा खर्च फारच कमी झाला होता. चित्रपटातील खोट्या लढाया |अजून नटांच्या अंगवळणी पडल्या नव्हत्या. त्यामुळे चित्रीकरण करताना अनेकजण जखमी होत. एका दिवशी तर तब्बल साठ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची नोंद आहे.
चित्रपटात पुरेसा सेक्स नाही असे अनेकांचे मत पडल्यामुळे काही अर्धनग्न गुलाम स्त्रियांची दृश्येही त्यात समाविष्ट करण्यात आली. या चित्रपटासाठी ग्रिफिथला सुमारे २० लाख डॉलर एवढा प्रचंड खर्च झाला. तो कधीच भरून निघाला नाही. लोकांना या प्रयोगाचे मोल कळाले नाही. अनेकांना तो कंटाळवाणा वा टला तर बहुतेकांना तो विस्कळीत वाटला. रशियात हा चित्रपट लोकप्रिय बनला पण त्याच्या त्या प्रती पायरेटेड होत्या. त्यामुळे ग्रिफिथला त्या लोकप्रियतेचा आर्थिक लाभ झाला नाही.
या चित्रपटानंतर ग्रिफिथने चार्ली चॅप्लिन, मेरी पिकफोर्ड वगैरे कलावंतांना घेऊन ‘युनायटेड आर्टिस्ट’ ही कंपनी काढली, परंतु हे आर्टिस्ट फार काळ युनायटेड राहू शकले नाहीत. लवकरच ग्रिफिथने ही कंपनी सोडली. यानंतर मात्र त्याला पूर्वीसारखे यश, नावलौकिक कधीच मिळाला नाही. चित्रपट बोलू लागल्यावरही त्याने दोन चित्रपट निर्माण केले, पण तेही चालले नाहीत. १९३१ सालच्या ‘द स्ट्रगल’ या चित्रपटाच्या अपयशानंतर मात्र ग्रिफिथने स्ट्रगल करणेच सोडून दिले. यानंतर १७ वर्षे तो जिवंत होता पण त्याने एकही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. १९४८ साली, सेरिब्रल हॅमरेज ने जेव्हा तो मरण पावला, तेव्हा तो एका हॉटेलात एकाकी जीवन कंठत होता.

ग्रिफिथला “आम्हा सर्वांचा शिक्षक” असे म्हणन चार्ली चॅप्लीनने गौरविले आहे. जॉन फोर्ड, ऑर्सनवेल्ससारखे दिग्दर्शकही त्याला या क्षेत्रातील दादा मानायचे. सर्वोत्कृष्ट ते देण्याचा त्याला ध्यास होता. बिली बिल्झर हा त्याचा कमेरामन एकदा म्हणाला, “मी जेव्हा एखादा शॉट घेणे अशक्य आहे असे म्हणे, तेव्हा ग्रिफिथ म्हणत असे म्हणून तर तो तुला घेतला पाहिजे.”

ग्रिफिथचे जीवन जसे वादग्रस्त ठरले तसेच त्याच्या मृत्युनंतरही अनेक वाद त्याच्या संदर्भात होतच राहिले. १९७५ साली अमेरिकन सरकारने त्याच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट काढले. त्यापूर्वी १९५३ साली डायरेक्टर गिल्ड ऑफ अमेरिकाने त्याच्या नावाने एक ग्रिफिथ अवार्ड देणे सुरू केले. डेव्हिड लीन, कुरोसावा , बर्गमन, हिचकॉक, अशा दिग्गजांना हे अवार्ड मिळाले, पण नंतर एक विलक्षण गोष्ट घडली. १९९९ साली ग्रिफिथवरचे वर्णद्वेषाचे आरोप पुन्हा उफाळून आले. त्यामुळे गिल्डने चक्क या पुरस्काराचे नाव ब दलन DGA life time Achievement Award असे ठेवले. इतकेच नव्हे तर नॉर्दन केंटुबकी युनिव्हर्सिटीमध्ये ग्रिफिथचे एक शिल्प लावलेले होते, तेदेखील युनिव्हर्सिटीने गुपचुप काढून टाकले.

हा इतिहास आठवताना आणखी एका विलक्षण योगायोगाची आठवण होते. मेलिए, पोर्टर आणि ग्रिफिथ हे तिघेही चित्रपटाच्या प्रारंभयुगाचे बिनीचे शिलेदार, त्यांनी चित्रपट कलेचा भक्कम पाया रचला. पण या तिघांचाही शेवट मात्र एकाकी अवस्थेतच झाला. असे का व्हावे? उत्कट कलायंतांना हा शापच असतो की काय?

विजय पाडळकर