ACHARYA ABHISHEK

लुइस माइलस्टोन – Lewis Milestone

कहाणी म्हणजे कुणावर दोषारोप नव्हे, कबुलीजबाब नव्हे, किंवा ही साहसकथा तर मुळीच नाही. कारण ज्यांना मृत्यूचे अस्तित्व समोर जाणवते त्यांच्यासाठी ते साहस नसते. ही अशा पिढीची कथा आहे, जी भले दारूगोळ्यापासून वाचली असेल, पण युद्धाने तिला उद्ध्वस्त करून टाकले होते...'

हा चित्रपट तयार होत होता तेव्हा सिनेमाचे मूकपटाकडून बोलपटाकडे अवस्थांतर होत होते. त्यावेळी निर्माते कदाचित द्विधा मनःस्थितीत असावेत. कारण हा चित्रपट त्यांनी मूकपट म्हणून करावयास घेतला होता, पण नंतर त्यांनी तो बोलपट केला. (या चित्रपटाची ‘मूक’ आवृत्ती खूप वर्षांनंतर वितरित केली गेली.) या चित्रपटासाठी माइलस्टोनने अफाट परिश्रम घेतले. कादंबरीला न्याय देता यावा म्हणन त्याने भरपुर अभ्यास केला. युद्धाच्या चित्रणात वास्तविकता यावी म्हणन त्याने जर्मन सेनेतल्या निवृत्त अधिकाऱ्यांना शोधून काढले. युनिफॉर्म, हत्यारे याबद्दल त्यांचा सल्ला घेतला आणि काहीजणांना चित्रपटात भमिकाही दिल्या. निर्मात्यांनीही या चित्रपटावर खूप खर्च केला. कॅलिफोर्नियातील रँचेसमध्ये शेकडो एकर जमिनीवर या युद्धाचे चित्रण करण्यात आले. या चित्रणात एकावेळी २००० एक्स्ट्रांनी भाग घेतला होता. हा चित्रपट वास्तवाच्या अधिक जवळ जावा यासाठी त्यात पार्श्वसंगीताचा उपयोग टाळला होता. मात्र काही थिएटरवाल्यांनी स्वतःच संगीत तयार करून ते पार्श्वसंगीतासारखे वापरले. या चित्रपटाचे प्रचंड स्वागत झाले. समीक्षकांनीही तो एकमुखाने नावाजला. मात्र, जर्मनीत त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. इटलीतही १९५६ पर्यंत तो दाखविला जाऊ शकला नव्हता.

ऑल क्वाएट…’ चित्रपटात शाळेतुन थेट रणांगणावर आणल्या गेलेल्या चार तरुणांची कथा सांगितली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला एका शाळेच्या खिडकीतून बाहेर चाललेली सैनिकांची परेड दिसते. शिक्षक विद्यार्थ्यांना देशभक्तीपर व्याख्यान देतो आहे… तुमच्या मातृभमीला तुमची गरज आहे. ती हाक मारते आहे. तिच्या हाकेला ओ देणे तुमचे कर्तव्य आहे…’ पॉल वमर, क्रॉप, ली आणि कॅमरिक हे चार मित्र आणखी तिघा तरुणांसह या आवाहनाला प्रतिसाद देऊन सैन्यात दाखल होतात. या तरुणांच्या मनात युद्धाविषयी अत्यंत रोमॅटिक कल्पना भरविलेल्या असतात. मात्र, रणांगणावर आल्यावर लगेचच त्यांचा प्रमुख हिम्मलस्टॉस त्यांना बजावतो, ‘तुम्ही आजवर जे शिकला आहात ते सर्वप्रथम विसरा. तुम्ही लढवय्ये बनणार आहात. त्यासाठी मी तुम्हाला कणखर बनवीन. तुमच्या ओठावरले आईचे दूध पुसन टाकीन…’

हा प्रमुख अत्यंत कठोरपणे या कोवळ्या तरुणांतन सैनिक निर्माण करण्याचे काम सुरू करतो. प्रचंड मेहनतीची कामे त्यांच्याकडन करून घेणे, त्यांना शारीरिक दंड देणे, चिखलातून माळरानातन कोपरावर सरपटत नेणे यांसारखे अनेक उपाय त्याच्यापाशी असतात. त्याचे एकच ध्येय असते- या मुलांतील माणस नाहीसा होऊन त्यांचे मशीन बनले पाहिजे. युद्धभूमीवर आल्यावर या तरुणांचा भ्रमनिरास होण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रथम त्यांना उपाशी राहण्यास शिकविले जाते. लवकरच त्यांना युद्धाचा पहिला अनुभव येतो. एक तोफेचा गोळा अगदी त्यांच्या जवळ येऊन फुटतो. त्यांच्यापैकी एकाची पँट भीतीने ओली होते. त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणतो, ‘हरकत नाही. तुमच्यापेक्षा शर माणसांचीही प्रथम हीच अवस्था झालेली आहे.

हे तरुण सीमेवर आले असता पहिल्या दिवशीच धुमश्चक्रीला सुरुवात होते. तोफेच्या माऱ्यामुळे उडालेले कण डोळ्यात जाऊन त्यांच्यापैकी एकजण सैरावैरा धाव लागतो. ‘माझे डोळे… मला काहीच दिसत नाही…’ तो ओरडतो. तेवढ्यात शत्रकडन एक मशीनगनची फैर येऊन त्याच्या अंगाची चाळण करते. काही क्षणांपूर्वी जिवंत असलेला जवळचा मित्र आता प्रेत बनलेला पाहून साऱ्यांच्या मनात मृत्युचा अर्थ उमट लागतो. भय मनात शिरते. ते पुर्णपणे निघून जातच नाही. मेलेल्या मित्राचे शरीर तरी अंत्यसंस्कारासाठी परत आणावे, असे एकजण म्हणतो. कमांडर त्याला परवानगी देत नाही. तो विचारतो, ‘तू का आपले प्राण धोक्यात घालतो आहेस?

‘कारण तो माझा मित्र आहे.

‘होता. आता तो एक प्रेत आहे. त्याला विसर.

लढाई माणसाला कशी भावनाशन्य बनवते, ही या चित्रपटाची प्रमुख थीम आहे. हळहळ या तरुणांना असे अनेक धडे मिळू लागतात. पण त्यासाठी त्यांना जबर किंमत द्यावी लागते. कुणाचा हात तुटतो, कुणाचा पाय कापला जातो, कुणाच्या शरीराचे तुकडे होतात…

‘ऑल क्चाएट…’मध्ये लढाईची अत्यंत अविस्मरणीय अशी दृश्ये आहेत. एका प्रसंगी फेंच सैनिक रांग धरून जर्मनांवर चाल करून येतात आणि कॅमेरा एकेका सैनिकाला ‘शूट’ करीत जातो. असंख्य सैनिक मरून पडतात. पण पुन्हा तेवढेच पुढे येत राहतात. जर्मनांनी खणलेल्या खंदकात ते उड्या घेतात. हे दृश्य असे घेतले होते की, जण प्रेक्षकांना ते आपल्या अंगावरच उडी घेतात की काय, असे वाटावे. हातघाईची लढाई सुरू होते. विव्हळणारे सैनिक, तुटलेले हात-पाय, आवेशाने पुढे सरकणाऱ्या रायफली, गोळ्यांचा आवाज, धूर यांचे तुकडे जोडत माइलस्टोनने युद्धाचे जिवंत चित्रण केले आहे.

Lewis-Milestone

जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. केमेरिकचा पाय जखमा चिघळू नयेत म्हणन कापून टाकलेला असतो. त्याला भेटण्यासाठी एक सैनिक येतो. त्याचे लक्ष केमेरिकच्या नव्या बुटांकडे जाते. तो म्हणतो, हे बूट मला दे. नाही तरी तुला त्यांचा काहीच उपयोग नाही.’ युद्ध हे माणसाचा नैतिक अधःपात घडवते, ही या सिनेमाची आणखी एक प्रभावी थीम. माणसाची सदसदविवेकबुद्धी युद्ध नष्ट करून टाकते. माणसाला ते पशूच्या पातळीवर आणते. आणखी एका न विसरता येणाऱ्या दृश्यात पॉल एका खंदकात लपून बसलेला असतो. अचानक एक शत्रुसैनिक त्याच खंदकात आश्रयासाठी उडी घेतो. पॉल घाबरून त्याच्यावर हल्ला करतो. त्याच्या गळ्यावर सुरी फिरवतो. वरच्या बाजस फ्रेंच शिपाई इकडे तिकडे पळत असतात. त्यांच्या सहकाऱ्याचे ओरडणे त्यांना ऐकु जाऊ नये म्हणन पॉल त्याचे तोंड दाबन धरतो. त्या फेंचाचा अजून जीव गेलेला नसतो. पण त्याला मारून टाकणे पॉलला जमत नाही. त्याचे तडफडणे चालूच असते. पॉल त्याला पाणी आणून देतो. मात्र आता फार उशीर झालेला असतो. मेलेल्या सैनिकाला उद्देशून पॉल म्हणतो, ‘आम्हाला कुणीच कधी का सांगितले नाही, की तुम्ही आमच्यासारखेच निरपराध आहात! तुमच्या आयाही आमच्याप्रमाणेच तुमची वाट पाहत असतील. मला क्षमा कर. कॉम्रेड…’ हे युद्ध आपण का लढतो आहोत, असा त्याला प्रश्न पडतो. लाखो लोक प्राण गमावतात. कारण काही थोड्या लोकांना अधिक सत्ता हवी असते. युद्धाने वाया जाणारी जीवने आणि युद्धाची निरर्थकता ही आता या चित्रपटाची तिसरी थीम बनते. पॉल जखमी होऊन काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याला रजा मिळते. तो घरी जातो. घरी साऱ्यांना अतिशय आनंद होतो. पण आता इथे त्याचे मन रमत नाही. मृत्यने पुसटसा का होईना, त्याला स्पर्श केला आहे व म्हणून तो साऱ्यापासन वेगळा पडतो. सुट्टी संपण्याआधीच दोन दिवस तो आघाडीवर परततो.

चित्रपटाचे शेवटचे दृश्य अविस्मरणीय आहे. पॉल थुंकून खंदकात बसला आहे. त्याला वरच्या बाजूस एक सुंदर फुलपाखरू एका कॅनवर येऊन बसलेले दिसते. तो त्याला धरण्यासाठी हळहळ आपला हात पुढे करतो. (पडद्यावरच्या फेममध्ये फक्त हाताची बोटे आणि दूरवरचे फुलपाखरू दिसते. सारे चित्रीकरण संपल्यावर माइलस्टोनला हा शॉट सुचला.

त्यावेळी नटही उपलब्ध नव्हते. त्यामुळे फुलपाखरू पकडणारा हात हा माइलस्टोनचा स्वतःचाच आहे.) फुलपाखरू थोडे उंच असते. त्याला पकडण्यास पॉल उभा राहतो आणि दर उभा असलेला एक फेंच सैनिक त्याला पाहतो. अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकु येतो आणि दुसऱ्याच क्षणी पॉल मृत होऊन खंदकात कोसळतो. शांत होतो…

एकामागोमाग एक पॉलचे सारे मित्र युद्धात बळी पडतात. पॉल ज्या दिवशी मरण पावतो त्या दिवशी तात्पुरती युद्धबंदी होते. युद्धस्थळावरून हेडक्वार्टरला संदेश पाठविला जातो- ‘पश्चिम आघाडीवर सर्वत्र सामसुम आहे.’ या मूळ जर्मन वाक्याचा आणखी एक अर्थ आहे- ‘पश्चिम आघाडीवर आज काहीच घडले नाही.

फक्त्त काही माणसे मरण पावली, एवढेच!

विजय पाडळकर