ACHARYA ABHISHEK

सर्गेई आयझेन्स्टिन

खऱ्या अर्थाने रशियन सिनेमाची ख्याती जगभर पोहोचविणारा दिग्दर्शक म्हणन सर्गेई आयझेन्स्टिनचे नाव घ्यावे लागेल.

‘ओडेसी स्टेप्स’ या नावाने सिनेइतिहासात अजरामर झालेला हा प्रसंग अनेकदा पाहिला. अजूनही ते दृश्य पाहताना मन थरारते. (इंटरनेटवर हा चित्रपट आता सर्वांना पाहण्यास उपलब्ध आहे.) हे दृश्य सुरू होते तेव्हा नागरिक आनंदाने खलाशांचे स्वागत करीत जमा होत असतात. त्यांच्या हसऱ्या चेहगांचे, हलणाऱ्या हातांचे क्लोजअप दाखवीत असताना अचानक पायऱ्यांवरून शिस्तबद्धपणे उतरणाऱ्या सैनिकांच्या बुटांच्या रांगेचे दृश्य समोर येते. पार्श्वसंगीत आता बदलते. जण अशुभाची सूचनाच. माणसे सैनिकांना पाहन सैरावैरा धाव लागतात. आता त्या पायऱ्यांचे विशालपण दाखविण्यासाठी एक लॉग शॉट वापरण्यात येतो. त्या पार्श्वभमीमळे माणसे लहान व दुबळी वाट लागतात. पळताना कुणी पडतात. कुणी पड़न उठतात. एक मुलगा लंगडत लंगडत जिवाच्या आकांताने धावत असतो. सैनिकांचे शिस्तबद्ध चालणे त्यांच्यातील माणुसकी संपून त्यांना केवळ यंत्राचे रूप आलेले आहे हे दर्शविते. बंदुकांच्या फैरी झडू लागतात. माणसे प्रचंड घाबरतात. एका माणसाच्या भेदरलेल्या चेहऱ्याचा क्लोजअप समोर येतो. नंतर त्याचे विस्फारलेले डोळेच फक्त पडदा व्यापून टाकतात. जणू भयाचाही आता विस्तार वाढलेला असतो. तीव्रता वाढलेली असते. सैनिक आणि नागरिक यांचे शॉट्स आलटन-पालटन दाखविले जातात. एक स्त्री जखमी मुलाला उचलून पायऱ्या चढू लागते. शेजारी प्रेतांचा खच पडू लागलेला. ती केविलवाणा आक्रोश करते. ‘माझा मुलगा आजारी आहे. त्याला गोळी घालू नका…’ पण तिच्याकडे लक्ष देण्यास कुणालाच सवड नाही. नागरिकांची पळापळ सुरूच असते. दुसरी एक स्त्री आपल्या लहान मुलाला बाबागाडीत घालून घेऊन आलेली असते. तिला सैनिकांची गोळी लागते. तिचा वेदनांनी पिळवटलेला चेहरा पडद्यावर दिसतो. ती कोसळताना तिचा धक्का बाबागाडीला लागतो. बाबागाडी उंच पायऱ्यांवरून वेगाने खाली घसरत येऊ लागते. आता दृश्याची गती वाढलेली, आलटन पालटन सैनिकांचे, पळणाऱ्या नागरिकांचे व घसरणाऱ्या बाबागाडीच्या चाकांचे शॉट पडद्यावर दिसतात. पार्श्वसंगीताचा गती वाढलेली असते. मध्येच बाबागाडीत झोपलेल्या मुलाचा क्लोजअप दिसतो. आता प्रेक्षकांच्या मनावरचा ताणही वाढलेला असतो. त्या छोट्याला गोळी लागेल की काय या आशंकेने आपण कासावीस होतो. गोळी लागू नये म्हणून मनोमन कामना करतो. ते मूल आता निरपराध असहाय्य मानवजातीचे प्रतीक बनून गेलेले असते.

केवळ सहा मिनिटांचे हे दृश्य चित्रित करण्यासाठी आयझेन्स्टिनने किती परिश्रम घेतले असतील हे पुन्हा एकदा तो प्रसंग पाहताना जाणवते. (प्रथम पाहताना तर आपण त्या भावनाट्यातच गुंतन पडलेलो असतो.) छायाचित्रण आणि संकलनाच्या प्रभावी वापरासाठी हे दृश्य जगभरच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकवले जाते, अभ्यासले जाते.

सामान्य माणूस हाच नायक असलेला ‘बॅटलशिप पोटेमकिन’ हा पहिलाच चित्रपट होय. म्हणूनच त्याला समुदायाचे महाकाव्य असेही म्हटले गेले. ‘कॅमेराची भाषा समर्थपणे व्यक्त करणारा कलावंत’ म्हणून आयझेन्स्टिनची यानंतर ख्याती पसरली. या सिनेमाने अभ्यासकांबरोबरच सामान्य प्रेक्षकावरही फार मोठा प्रभाव पाडला.

‘ओडेसी स्टेप्स’ची घटना सत्य आहे की, नाही याबद्दल वाद आहेत. ती काल्पनिक असावी, असे अनेकजण मानतात.

(चित्रपटाचा शेवट मात्र पुर्ण काल्पनिक आहे. प्रत्यक्षात खलाशांचे बंड निघृणपणे चिरडले गेले होते.) प्रसिद्ध सिनेसमीक्षक रॉजर इबर्ट लिहितो, “ही कल्पित घटना आहे, असे सिद्ध झाले तरी त्यामुळे त्या दृश्यातली ताकद कमी होत नाही.

दिग्दर्शकाने ती इतक्या प्रभावीपणे चित्रित केली आहे की, लोक तिला सत्य समज लागले हे त्याचे मोठेपण आहे.’ आयझेन्स्टिनने या चित्रपटात ‘इंटलेक्चुअल मोंताज’ या तंत्राचा प्रभावी उपयोग केला. तो उत्तम लेखकही होता.

चित्रपटाच्या भाषेसंबंधी त्याने केलेले विपुल लेखन सहा खंडांत उपलब्ध आहे. The Film form आणि The Film Scene ही त्याची गाजलेली पुस्तके ‘चित्रपटाचे आद्य व्याकरण’ म्हणून ओळखली जातात. ‘बॅटलशिप पोटेमकिन’ हा चित्रपट जगभर गाजला तरी इंग्लंडमध्ये त्याच्यावर बरीच वर्षे बंदी होती. या चित्रपटामुळे कामगारांना चिथावणी मिळेल, अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती.

मात्र अशा महान दिग्दर्शकाची कारकीर्द फारच खडतर ठरली. रशियात कम्युनिझमचे जे वारे वाहू लागले होते त्या वातावरणात विशुद्ध कलेला काहीच किंमत नव्हती. आयझेन्स्टिनच्या ‘ऑक्टोबर’ (१९२७) या चित्रपटावर कम्युनिस्ट पक्षाने टीका केली. त्याला पुढे दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळेनासे झाले. काही दिवसांनी एका अमेरिकन कंपनीने त्याला चित्रपट निर्मितीसाठी अमेरिकेत बोलावले. तेथे त्याने काही चित्रपटांच्या संहिता लिहूनसादर केल्या. मात्र त्याचा कलात्मक दष्टिकोन व अमेरिकन कंपन्यांचा धंदेवाईक दृष्टिकोन यांचा मेळ बसणे शक्यच नव्हते. या संदर्भात एक उदाहरण फार बोलके आहे. डेव्हिड सेल्झेनिक त्या काळी एम. जी. एम. साठी काम करीत होता. त्याने ‘बॅटलशिप पोटेमकिन’ पाहून असे उद्गार काढले होते की, ‘चित्रकारांनी जसा राफेलचा अभ्यास केला पाहिजे तसा अभ्यास सिनेदिग्दर्शकांनी या चित्रपटाचा करणे आवश्यक आहे.’ आयझेन्स्टिनने एम.जी.एम.साठी ‘अमेरिकन ट्रॅजिडी’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. सेल्झेनिकने त्या पटकथेसंबंधी पुढील उद्गार काढले, ‘The most moving script I have ever read.’

नवलाची गोष्ट म्हणजे याच सेल्झेनिकने एम.जी.एम.ला ही पटकथा नाकारण्याचा सल्ला दिला. कारण काय, तर या पटकथेवरील चित्रपट फार खर्चिक ठरेल आणि महत्त्वाचे म्हणजे आनंदी अमेरिकन प्रेक्षकांना हा चित्रपट पाहून दोन तासांचे दुःख मात्र अनुभवावे लागेल. कलात्मक सिनेमा’ आणि व्यावसायिक सिनेमा’ असे वर्गीकरण त्या वेळेपर्यंत झालेले नसले तरी दोन्हीमध्ये दरी पडावयास सुरुवात झाली होतीच.

आयझेन्स्टिन १९३० मध्ये अपयश पदरात घेऊन रशियात परतला. प्रख्यात लेखक ऑप्टॉन सिन्क्लेअर हा आयझेन्स्टिनचा चाहता होता. त्याने आयझेन्स्टिनला मेक्सिकोत बोलावून एक चित्रपट निर्माण करण्याचे प्रोजेक्ट दिले.

त्यासाठी सिंक्लेअरने बरीच मोठी रक्कमही गुंतविली. पण येथेही अमेरिकेतील इतिहासाची पुनरावृत्ती झाली. तो पुन्हा रशियात परतला. मात्र तो अमेरिका व मेक्सिकोत जाऊन आल्यामुळे रशियन कम्युनिस्ट त्याच्याकडे संशयाने पाहु लागले

तशात त्याच्या मनाचा तोलही काहीसा बिघडला. त्या विलक्षण बुद्धिमान व संवेदनशील कलावंताला ही उपेक्षा, हे अपयश सहन झाले नाही. काही काळ त्याला मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. बरा झाल्यानंतर थोडे दिवस त्याने चित्रपट शिक्षणाच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. नंतरच्या काळात त्याला काही चित्रपट मिळाले. त्यापैकी ‘इव्हान द टेरिबल’ हा चित्रपटच त्याचा पूर्वलौकिक सांभाळणारा होता. त्याला स्टॅलिन अवॉर्ड मिळाले. मात्र या चित्रपटाचा पुढला भाग ‘इव्हान द टेरिबल-पार्ट २’ वर पुन्हा सरकारची गैरमर्जी झाली. अपूर्णावस्थेतच त्याची काही रीळे जप्त करून जाळण्यात आली.

१९४८ साली वयाच्या पन्नासाव्या वर्षी आयझेन्स्टनचे मेंदतील रक्तस्रावाने निधन झाले. त्याच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने २३ जानेवारी १९९८ रोजी रशियात दोन रुबल्सची दोन नाणी प्रसृत करण्यात आली, या नाण्यांवर आयझेन्स्टिनची प्रतिमा आहे. कलावंताच्या नशिबाची, उपेक्षेची व मरणोत्तर सन्मानाची ही नेहमीचीच कहाणी आहे, नाही का?

विजय पाडळकर